Sun, Jul 21, 2019 00:20होमपेज › Pune › दुसरा संसार थाटण्याच्या प्रयत्नातील वृद्धाला दणका

दुसरा संसार थाटण्याच्या प्रयत्नातील वृद्धाला दणका

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:46AM

बुकमार्क करा

 पुणे : प्रतिनिधी 

पत्नीची व मुलीची साथ सोडून दुसर्‍या महिलेसोबत संसार थाटण्याच्या तयारीत असलेल्या    65 वर्षीय वृद्धाला न्यायालयाने दणका दिला आहे.  दुसर्‍या महिलेचा नाद सोडून देण्याचे कोर्टापुढे सांगून वृद्धाने पत्नी व मुलीची जबाबदारी स्वीकारली. पुणे जिल्हा न्यायालयात तडजोडीअंती हा दावा निकाली काढण्यात आला. 

दुसर्‍या महिलेसाठी त्रास दिल्यावर  57 वर्षीय मीरा आणि त्यांची मुलगी विशाखा यांनी  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. घारगे यांच्या कोर्टात दावा दाखल केला होता. दावा दाखल केल्यापासून केवळ दोन महिन्यांच्या आत महिला कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायद्याअंतर्गत हा दावा निकाली काढण्यात आला. 

ऑक्टोबर 1992 मध्ये राजीव यांच्याशी (सर्व नावे बदलेली) महिलेचे लग्न झाले होते. त्यांना एक 23 वर्षीय मुलगी असून ती इंजिनिअर आहे. मात्र 64 व्या वर्षी (राजीव) यांच्या आयुष्यात दुसरी महिला आली. तिच्यासोबत  राहता यावे म्हणून त्याने पत्नी आणि मुलीच्या जबाबदारीकडे पाठ फिरविली. सर्व संपत्ती विकून त्यांना सोडून दुसर्‍या महिलेसोबत जाण्याची तयारी केली होती. मात्र कोर्टात दावा दाखल झाल्याने त्यांना आपली चूक समजली. सुचित मुंदडा, अ‍ॅड. शीतल चरखा यांच्यामार्फत दावा दाखल केला.