Thu, Jan 17, 2019 03:52होमपेज › Pune › संविधानाला धक्का लागू देणार नाही

संविधानाला धक्का लागू देणार नाही

Published On: Jan 01 2018 2:02AM | Last Updated: Jan 01 2018 1:14AM

बुकमार्क करा
पुणे : वार्ता

अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकमधील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संविधान बदलण्याचे विधान केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. आम्ही सत्तेत असलो, तरी हेगडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहोत. मी सत्तेत असेपर्यंत संविधानाला थोडाही धक्का लागणार नसल्याचा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी  ना. आठवले पुणे दौर्‍यावर होते. त्या वेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा कारभार चांगल्या प्रकारे सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या नेत्यांनी सरकारला अडचणीत आणू नये, असा सल्लादेखील आठवले यांनी भाजपच्या वाचाळवीरांना दिला आहे.  2019 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने युती करून लढवाव्यात. शिवसेनेने जागावाटपात ताठर भूमिका घेऊ नये. शिवसेना आणि भाजपची युती तुटली, तर मात्र रिपाइं (ए) भाजपसोबतच राहील, असेही त्यांनी सांगितले.