Thu, May 23, 2019 15:03
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › थर्माकोलच्या मखरांवर जप्तीची कारवाई

थर्माकोलच्या मखरांवर जप्तीची कारवाई

Published On: Sep 13 2018 1:46AM | Last Updated: Sep 13 2018 1:33AMपुणे : प्रतिनिधी

राज्य शासनाने थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत गेली सहा दिवसात दीडशे किलो थर्माकोलच्या वस्ती आणि मखरे जप्त केली आहेत. 

थर्माकोल आणि प्लास्टिक हे दोन्ही घटक पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याने राज्य सरकारने या दोन्हींच्या वापरावर आणि साठ्यावर बंदी घातली आहे. या बंदीच्या विरोधात काही व्यापारी उच्च न्यायालयात गेले होते. मात्र, न्यायालयाने प्लास्टिकबरोबरच थर्माकोलवरील बंदीही कायम ठेवली आहे. त्यानंतरही गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या शहरामध्ये अनेक दुकानांमध्ये थर्माकोलच्या आरास, मंदिरे, मखर, प्लास्टिक हार व इतर साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहे. 

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाई अंतर्गत 6 ते 12 सप्टेंबर दरम्यान दीडशे किलो थर्माकोलच्या आरास, मंदिरे, मखर, प्लास्टिक हार व इतर साहित्य जप्त केले आहे. यात 10 केस करून 50 हजार रुपयाचा दंड वसूल केला. तर बुधवारी भोहरी अळी येथे कारवाई करून 30 किलो थर्माकोल जप्त करून 2 पावत्या दंडाच्या फाडण्यात आल्या. ही कारवाई आरोग्य निरीक्षक उमेश देवकर, शाहू पोकळे, राजेश रासकर, अमोल पवार यांच्या पथकाने केली.