Fri, Sep 21, 2018 00:35होमपेज › Pune › महिला दिनापासून धावणार ‘तेजस्विनी’

महिला दिनापासून धावणार ‘तेजस्विनी’

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 12:23AMपुणे : : प्रतिनिधी

महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी सुरू करण्यात येणार्‍या ‘तेजस्विनी’ आठ विविध मागार्र्ंवर दि. 8 मार्च पासून धावणार आहेत. प्रत्येक मार्गावर 25 ते 40 मिनिटांनी बस सोडण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. तसेच विविध मार्गावरील तिकीट दरसुद्धा निश्‍चित करण्यात आले आहेत.

खास महिलांसाठी  तेजस्विनी बसेससाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. या बसेसच्या खरेदीसाठी अजूनही  निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच ‘पीएमपी’कडून खरेदी करण्यात येणार्‍या  200 मिडी बस टप्प्या-टप्प्याने ताफ्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 30 बसेस महिला दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात येणार आहेत. या बसेस तेजस्विनी या  नावाने धावणार आहेत.