Wed, Jun 26, 2019 18:28होमपेज › Pune › जिल्ह्यात 47.84 लाख टन गाळप

जिल्ह्यात 47.84 लाख टन गाळप

Published On: Jan 09 2018 2:04AM | Last Updated: Jan 09 2018 1:36AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील कारखान्यांनी 5 जानेवारीअखेर सुमारे 47 लाख 84 हजार 32 टन ऊस गाळप पूर्ण केलेले आहे. साखर उतार्‍यात वाढ झाली असून  10.48 टक्के उतार्‍यानुसार 50 लाख 12 हजार 50 क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आलेले आहे. जिल्ह्यात 11 सहकारी आणि 6 खासगी कारखान्यांकडून ऊस गाळप जोमाने सुरू असल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.    बारामती अ‍ॅग्रो या खासगी कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप आणि साखर उत्पादनातील आपली आघाडी कायम ठेवली आहे. या कारखान्याने सर्वाधिक म्हणजे 4 लाख 93 हजार 365 टन गाळप पूर्ण केलेले आहे. सरासरी साखर उतारा 10.55 टक्के असून 5 लाख 20 हजार 300 क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आलेले आहे.

तर, ऊस गाळपात इंदापूर सहकारी कारखान्याने 4 लाख 35 हजार 990 टन ऊस गाळप पूर्ण करुन दुसरे स्थान पटकाविले आहे. तर, या कारखान्याने 9.99 टक्के उतार्‍यानुसार 4 लाख 35 हजार 500 क्विंटल साखरेचे उत्पादन तयार केलेले आहे. साखर उत्पादनात दौंड शुगर दुसर्‍या स्थानावर असून 4 लाख 54 हजार 450 क्विंटल साखर उत्पादन तयार केलेले आहे. तर साखर उतार्‍यात सोमेश्‍वर सहकारी अग्रस्थानी असून या कारखान्याचा उतारा 11.19 टक्के आहे. 

जिल्ह्यात 5 जानेवारीअखेर कारखानानिहाय झालेले ऊस गाळप टनात पुढीलप्रमाणे. (कंसात साखर उत्पादन क्विंटलमध्ये) ः  सोमेश्‍वर सहकारी 383480 (429250), माळेगाव 261000 (279200), छत्रपती 293487 (278100), भीमा पाटस 183520 (162575), विघ्नहर 379580 (413300), इंदापूर 435990 (435500), राजगड 73745 (67400), संत तुकाराम 218910 (225225), घोडगंगा 293060 (311050), भीमा शंकर 292830 (316700), निरा-भीमा सहकारी 268190 (274370). खासगी कारखान्यांमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा 229675 (241815), अनुराज शुगर्स 204740 (218600), बारामती अ‍ॅग्रो 493365 (520300), दौंड शुगर 412220 (454450), व्यंकटेशकृपा शुगर 242354 (258580), पराग अ‍ॅग्रो 117886 (125635) आदींचा समावेश आहे.     
    
जिल्ह्यातील 11 सहकारी कारखान्यांनी 30 लाख 83 हजार 792 टन ऊस गाळपातून 10.35 टक्के उतार्‍यानुसार 31 लाख 92 हजार 670 क्विंटल साखरेचे उत्पादन हाती घेतले आहे. तर 6 खासगी कारखान्यांनी 17 लाख 240 टन ऊस गाळप केले आहे. तर 10.70 टक्के उतार्‍यानुसार 18 लाख 19 हजार 380 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर जिल्ह्यात एकूण 47 लाख 84 हजार 32 टन ऊस गाळप झाले आहे. सरासरी उतारा 10.48 टक्के हाती आला असून 50 लाख 12 हजार 50 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार झाल्याचे सांगण्यात आले.