Sat, Aug 24, 2019 23:27होमपेज › Pune › सरकारी इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प

सरकारी इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे :

पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी (आयआयटीएम) मध्ये छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवम यांच्या हस्ते हे अनावरण आज झाले. यावेळी आयआयटीएम, पुणेचे प्रा. रवी एस. नानजूनडीयाह उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौर उर्जा राष्ट्र निर्मितीच्या उद्दिष्ट्याच्या दिशेने एमओईएसमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.    

क्लीन मॅक्स सोलार या कंपनीने हा प्रकल्प बसविला आहे. भूविज्ञान मंत्रालय येथे बसविण्यात आलेला छतावरील सौर उर्जा प्रकल्प ‘पे अ‍ॅज यू गो’ किंवा ओपेक्स मॉडेल आधारित आहे. तो गुंतवणूक मुक्त, जोखीम रहित आणि गुंतागुंत-मुक्त आहे. या प्रकल्पामुळे वीज पारेषणच्या किंमतीहून 30 टक्के स्वस्त दरात उर्जा मिळेल. हे असे छतावरील सौर उर्जा प्रकल्प दिल्ली, नोयडा, हैदराबाद, चेन्नई आणि  पुणे याठिकाणीदेखील बसविण्यात आले आहेत.तेथे 968 केडब्ल्यूपी क्षमतेची यंत्रणा कार्यान्वित असून त्यामुळे वर्षाकाठी 1200 टनांहून अधिक होणारे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी झाले.तसेच वार्षिक 36.54 लाखांची बचत झाली.

या भागीदारीबद्दल बोलताना क्लीनमॅक्स सोलारचे सह-संस्थापक अँड्र्यू हिन्स म्हणाले की, सरकार आणि संस्थात्मक ग्राहकांना सौर उर्जा पर्याय उपलब्ध करून देण्यात सध्या आम्हाला भारतात उत्तम संधी दिसते आहे.