Sat, Nov 17, 2018 12:22होमपेज › Pune › महाराष्ट्रामधील काही ‘बडे’ नेते  ‘वोट के सौदागर’

महाराष्ट्रामधील काही ‘बडे’ नेते  ‘वोट के सौदागर’

Published On: Feb 05 2018 1:55AM | Last Updated: Feb 05 2018 1:52AMपुणे ः प्रतिनिधी

मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रथा, संपुष्टात आणण्यासाठी केंद्र शासनाने ठोस पाऊल उचलले आहे; मात्र महाराष्ट्रातील काही ‘बडे’ नेते फक्त ‘वोट के सौदागर’ असून राजकराणासाठी त्यांचा या निर्णयाला विरोध सुरू असल्याची टीका केंद्रिय सूक्ष्म व लघुउद्योगमंत्री गिरिराज सिंह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली. पुण्यातील एका पूर्व नियोजित पत्रकार परिषदेत बोलताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रशनावर सिंग यांनी टीकास्त्र सोडले.  हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेत औरंगाबादमध्ये शरद पवार यांनी केंद्राच्या तिहेरी तलाकवरील निर्णयासंदर्भात केंद्र सरकारवर कडक शब्दात टीका केली होती.  

पवारांच्या या वक्तव्याकडे पत्रकरांनी सिंग यांचे लक्ष वेधले असता, पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शरद पवार महाराष्ट्रातील बडे नेते आहेत. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. जगामध्ये तिहेरी तलाक पद्धतीचा असा कायदा तब्बल 22 देशांनी संपुष्टात आणला आहे; मात्र, भारतातील काही राजकीय पक्ष ही तिहेरी तलाक पद्धत संपुष्टात येऊ नये, या साठी प्रयत्न करत आहेत. वेळोवेळी विरोध आणि आंदोलन करणार्‍या काही विरोधी पक्षांमुळे मुस्लिम समाजातील महिलांना त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.