Thu, Jul 18, 2019 16:29होमपेज › Pune › ‘स्कायवॉक’च्या कामाला मिळाली गती

‘स्कायवॉक’च्या कामाला मिळाली गती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची रेल्वेने घेतली दखल 

पुणे स्टेशनच्या पाठीमागील बाजूस राजाबहादूर मिल रोड येथील स्कायवॉकच्या कामाला अखेर गती मिळाल्याचे दिसून येत आहे. 23 ते 30 नोव्हेंबरदरम्यान या स्कायवॉकचे साइड की रेलिंग व कव्हर शेड बसविण्याचे काम रेल्वेच्या वतीने हाती घेण्यात आले असून, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ते जहांगीर रुग्णालयादरम्यान एका बाजूचा रस्ता रात्री 11 ते पहाटे 5 दरम्यान वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे स्कायवॉकचे रखडलेले काम झपाट्याने पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

‘स्टेशनमागील स्कायवॉकचे काम संथ गतीने’, या आशयाचे वृत्त दै. ‘पुढारी’ने सर्वप्रथम 22 नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्तात अपुर्‍या निधीमुळे काम रखडल्याचेही नमूद करण्यात आले होते. त्याचबरोबर पिलरच्या कामाव्यतिरिक्त अन्य काम सुरूच झाले नसल्याचेही वृत्तात लिहिले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत स्कायवॉकच्या रखडलेल्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, एप्रिल महिन्यात तो पूर्णत्वास येईल, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, हा स्कायवॉक सर्व स्थानकांना जोडण्यात येणार असून, त्याचे काम पूर्ण होऊन तो प्रवाशांसाठी खुला करण्यात आल्यानंतर प्रवाशांची निश्‍चितच चांगली सोय होणार आहे.