Mon, Sep 24, 2018 19:38होमपेज › Pune › पुण्यात अट्टल चोरट्यास अटक, ८० तोळे सोने जप्‍त

पुण्यात अट्टल चोरट्यास अटक, ८० तोळे सोने जप्‍त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

घरफोडीने त्रस्त असलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील काही गुन्हे उघडकीस आणण्यात सिंहगड रस्ता पोलिसांना यश आले आहे. दिवसाढवळ्या घरे फोडणार्‍याला पोलीसांनी अटक करुन ८० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या परिसरात होत असलेल्या घरफोड्यांमध्ये आरोपी सापडत नव्हते, दिवसा होत असलेल्या घरफोड्यांमुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. येथील काही पोलिस कर्मचार्‍यांना एका आरोपीचा सुगावा लागला होता. त्‍याच्यावर कारवाई करण्यास गेल्यानंतर संशयिताने एका इमारतीच्या चौथ्या  मजल्‍यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्‍न केला होता. पोलिसांनी वेळीच त्‍याच्यावर कारवाई केल्याने त्याने अनेक घरफोड्या केल्याचे मान्‍य केले. यापूर्वीही त्‍याच्यावर अनेक गुन्‍हे प्रलंबित असून तो जामीनावर सुटला होता. चोरीतील दागिने घोरपडी पेठेतील सराफाला विकले असल्याचे त्‍याने सांगितले. यावेळी त्या सराफाकडून तीस लाख रुपयाचे ८० तोळे दागिने जप्‍त करण्यात आले आहेत.