Mon, May 20, 2019 22:25होमपेज › Pune › विनयभंगांचे चित्रीकरण;तरुणाला कोठडी

विनयभंगांचे चित्रीकरण;तरुणाला कोठडी

Published On: Dec 17 2017 2:20AM | Last Updated: Dec 17 2017 1:57AM

बुकमार्क करा

पुणे : प्रति.िनधी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग होत असतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याला 19 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आकाश उर्फ नान्या राजू साठे (वय 19, रा, वडगावशेरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी करण युवराज हातागले (वय 19) आणि बनकर उर्फ दादा तानाजी जाधव (वय 19,  दोघेही रा. विमाननगर) यांना अटक करण्यात आली असून, ते दोघे पोलिस कोठडीत आहेत.

याबाबत 15 वर्षीय पीडित मुलीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  वडगांवशेरी येथील कावेरी हॉटेल येथून पायी जात असताना करण याने आपल्या साथीदारांसह तुला आमच्याशी बोलायचे आहे किंवा नाही असे म्हणून 10 डिसेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास पीडित मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना उत्तर न देता पीडित मुलगी पुढे निघून गेली. त्यानंतर तिचा पाठलाग करून तिला अडवून हाताने मारहान करून विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आकाश याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याने विनयभंग करतानाचे चित्रीकरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरचा मोबाईल जप्त करण्यासाठी करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनाविली.