Thu, Mar 21, 2019 15:24होमपेज › Pune › अन् उलगडले ५० वर्षांपूर्वीच्या रायगडाचे चित्रदर्शी रूप

अन् उलगडले ५० वर्षांपूर्वीच्या रायगडाचे चित्रदर्शी रूप

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतरचा काही वर्षांचा कालावधी..., त्यात स्वत:च्या पायवर उभारण्यासाठीच्या सरकारच्या धडपडी.., चित्रपट क्षेत्रात होणारा अतुलनीय बदलांचा काळ..., एकीकडे शिवकाळ संपल्यानंतरही अंगावर येत राहणारा शिवशाहीचा शहारा..., डोंगराळ भाग आणि घनदाट जंगल... असे वातावरण दर्शविणार्‍या दुर्मिळ 50 वर्षांपूर्वीच्या कृष्णधवल लघुपटातून ‘किल्ले रायगड’ चे चित्रदर्शी रूप उलगडले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘किल्ले रायगड’ वर पन्नास वर्षांपूर्वी केलेला दुर्मिळ लघुपट पाहण्याची संधी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून सोमवारी चित्रपट रसिकांना मिळाली. कोल्हापूरचे चित्रपट निर्माते माधव शिंदे यांनी बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 27 नोव्हेंबर 1967 रोजी या लघुपटाची निर्मिती केली होती, त्याचेच औचित्य साधून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत चित्रपट रसिकांना हा लघुपट दाखविला.

या वेळी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम उपस्थित होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (लॉ कॉलेज रस्ता) चित्रपटगृहात या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. कोल्हापूर चित्रनगरीच्या खास पठडीत तयार झालेले आणि ‘शिकलेली बायको’, ‘गृहदेवता’, ‘धर्मकन्या’ यासारखे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित करणारे माधव शिंदे यांनी हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. मंगेशकर कुटुंबांच्या ‘महालक्ष्मी चित्र’ ने त्याची निर्मिती केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात रायगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात घेऊन दिग्दर्शक शिंदे यांनी या लघुपटात ‘किल्ले रायगड’चे संपूर्ण अंतरंग उलगडून दाखविले.