Fri, Jul 19, 2019 16:17होमपेज › Pune › धुळ्यात सापडले शिवकालीन पत्र(Video)

धुळ्यात सापडले शिवकालीन पत्र(Video)

Published On: Jun 22 2018 5:28PM | Last Updated: Jun 22 2018 6:20PMपुणे : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पत्रे आपल्या स्वराज्याचा कारभार चालवितानाऱ्या कारभाऱ्यांना लिहली आहेत. त्यापैकीच एक पत्र इतिहास संशोधक घनश्याम ढाणे यांना धुळ्यातील समर्थ वाग्‍देवता मंदिर येथे सापडले आहे.

वसंत चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने घनश्याम ढाणे यांना सापडलेल्या इतिहासकालीन पत्राविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.रजनी इंदुलकर उपस्थित होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिलेले अस्सल अप्रकाशित पत्र प्रकाशझोतात आले असून, इतिहास अभ्यासक घनश्याम डहाणे यांनी त्याचा अनुवाद केला आहे. धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात हे पत्र आढळले आहे. मोडी भाषेतील या पत्रात वरच्या बाजूला मंगलाकार ही शिवकालीन खूण आढळली असून, त्याखेरीज पत्रात शिवकालीन धाटणीचा मजकूर लिहिलेला आहे. या पत्राच्या मागील बाजूस मुस्लिम कालगणनेप्रमाणे तारीख लिहिलेली आहे. त्यानुसार 2 फेब्रुवारी 1674 रोजी पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. सुमारे 344 वर्ष जुने असलेल्या या पत्राच्या शाईचा दर्जा आजही व्यवस्थित टिकून आहे. रायगडावरून पाली येथे पाठवलेले हे पत्र राज्याभिषेकाच्या पाच महिने आधीचे आहे.

 

महाराजांनी नागोजी पाटील कालभार (आत्ताचे काळभोर) यांना लिहिले आहे. पाली गावचे पाटील असणाऱ्या कालभार यांची पाटीलकी खराडे पाटील हिरावुन घेत होते. त्याविषयावर महाराजांनी कालभार पाटील यांना अभयपत्र किंवा कौलनामा लिहिला आहे.

याबाबत माहिती देताना डहाणे यांनी महाराजांची एकूण 273 पत्र प्रकाशित असून, त्यापैकी 103 स्थायी स्वरूपात उपलब्ध असल्याचे सांगितले.1674 सालचे पत्र असल्याचा घनश्याम ढाणे यांचा दावा

-  पत्र राज्याभिषेकाच्या पाच महिने आधीचे 

- पत्राची लांबी 1 फूट 3 इंच 

- रुंदी 6.5 इंच