होमपेज › Pune › शनिवारवाड्यावर सांस्कृतिक कार्यक्रम होणारच : मुक्ता टिळक 

शनिवारवाड्यावर सांस्कृतिक कार्यक्रम होणारच : मुक्ता टिळक 

Published On: Jan 30 2018 4:38PM | Last Updated: Jan 30 2018 5:05PMपुणे : प्रतिनिधी

ऐतहासिक शनिवारवाड्यावर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास महापालिका प्रशासनाने बंदी घातल्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयावर आज सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. ज्या शनिवारवाड्यावर स्वातंत्र्याचा उत्सव साजरा झाला त्‍या शनिवारवाड्यावर कार्यक्रम घेण्यास बंदी का घालण्यात आली असा सवाल उपस्‍थित करण्यात येत आहे.

शनिवार वाड्यावर कार्यक्रम करायला परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय पोलिसांनी घ्‍यायचा आहे.  महापालिकेला हा अधिकार कोणी दिला असा सवाल भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी केला. अखेर महापौर मुक्ता टिळक यांनी याबाबतचा निर्णय सभागृहच घेणार असून, तोपर्यंत कार्यक्रम सुरू राहतील असे जाहीर केले. मात्र त्यानंतरही आयुक्तांनी हा निर्णय कोणाच्या आदेशावरून घेतला या मुद्द्यावरून सभेत बराच वेळ गोंधळ सुरू होता.