Sun, May 19, 2019 14:33
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ....म्हणून शनिवारवाडा सजणार निळ्या दिव्यांनी

....म्हणून शनिवारवाडा सजणार निळ्या दिव्यांनी

Published On: Apr 11 2018 7:44PM | Last Updated: Apr 11 2018 7:44PMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील ऐतिहासिक वास्तू शनिवार वाडा निळ्या दिव्यांनी सजणार आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा, रोटरी क्लब ऑफ पुणे पौंडरोड आणि साद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 8 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत निळ्या रंगाच्या दिव्यांनी शनिवार वाडा सजविला जाणार आहे. स्वमग्नता (ऑटीझम) या स्थितीतील रुग्णांविषयी जनजागृती व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एप्रिल हा स्वमग्नता महिना म्हणून ओळखला जातो. या मोहिमेचा भाग म्हणून विविध स्मारके निळ्या रंगाच्या प्रकाशात सजविले जातात. भारतात कुतुबमिनार, मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस सुद्धा अशा प्रकाशात सजविली गेली होती. असाच उपक्रम शनिवारवाडा येथे प्रथमच घेण्यात आला आहे. येथे स्वमग्नतेबद्दल जनजागृतीसाठी भित्तिपत्रके, फलक सुद्धा लावले आहेत. पुणेकरांनी या आजाराच्या स्थितीबद्दल जाणून घेऊन त्याविरोधी लढ्यात आपला सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Tags : pune, shanivarwada, Decorate, blue lamps, pune news