होमपेज › Pune › शिवणे-खराडी रस्ता कागदावरच

शिवणे-खराडी रस्ता कागदावरच

Published On: Feb 05 2018 9:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:12AMपुणे ; पांडुरंग सांडभोर

शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्वकांक्षी ठरू शकणार्‍या शिवणे ते खराडी नदी काठचा रस्त्याचा तिढा तब्बल सात वर्ष उलटून सुटण्यास तयार नाही. तब्बल साडेसतरा किमीचा मार्ग भूसंपादनाच्या प्रकियेत अडकला आहे. यामधील संगमवाडी ते खराडी हा रस्ता मार्गी लागल्यास नगररस्त्यावरील वाहतुक कोंडी सुटण्यास मोठी मदत मिळणार आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात शिवणे ते खराडी हा नदीकाठचा रस्ता आरक्षित करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या रस्त्याच्या कामाचे शिवणे ते म्हात्रे पूल (6 किमी), म्हात्रे पूल ते संगमवाडी (5 किमी) आणि संगमवाडी ते खराडी (11.50) किमी असे  एकूण तीन टप्पे करण्यात आले आहेत.

त्यामधील शिवणे ते म्हात्रे पूल आणि संगमवाडी ते खराडी या रस्त्याचे काम महापालिकेने हाती घेतले असून डिफर्ट पेमेंट पध्दतीवर हा रस्ता विकसीत करण्यात येणार आहे. त्यासाठी 2011 मध्ये 363 कोटींची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र गेल्या सात वर्षात हा भूसंपादनाअभावी कागदावरच आहे. यापुर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर आता सत्तेवर आलेले सत्ताधारी भाजप हे दोन्ही यातून मार्ग काढण्यासाठी अपयशी ठरले आहेत. प्रशासनाकडून केवळ बैठकावर बैठका घेतल्या जात आहे. मात्र त्यावर मार्ग निघत नसल्याने या रस्त्याचे काम रखडलेलेच आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला तब्बल तीनवेळा मुदतवाढ देण्याची नामुष्क़ी ओढावली असून परिणामी या रस्त्याच्या खर्चात कोट्यावधींनी वाढ होण्याची भिती आहे. ही आहे जमिन मालकांची मागणी

खराडी परिसरात नदीकाठी जो ग्रीन बिल्टचा परिसर आहे. त्यापासून नदीकाठचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता ग्रीनबिल्ट मध्ये सरकाविण्यात यावा अशी मागणी या भागातील जमिन मालकांची आहे, मात्र, विकास आराखडा मंजुर झाला असल्याने त्यात बदल करता येणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यात आता काही जागा मालकांनी जागा देण्यास तयारी दर्शविली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

तर नगररस्त्यावरील वाहतुक प्रश्‍न सुटेल

शिवणे ते खराडी या रस्त्यामध्ये संगमवाडी ते खराडी या जवळपास 12 किमीच्या रस्त्याचा समावेश आहे. त्यात जुना जकातनाका ते खराडी गावठाण (सुमारे 5 कि. मी.), कोद्रे फार्म ते खराडी गावठाण (सुमारे 1.5 कि. मी.), पर्णकुटी चौकी ते सादलबाबा दर्गा चौक (सुमारे 800 मीटर) एवढे भूसंपादन खासगी भूसंपादन करायचे आहे. त्यात कोणतेही भूसंपादन करायचे नाही, मात्र, तरीही हे भूसंपादन होत नसल्याने हा रस्ता रखडला आहे. सद्यस्थितीला नगररस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी रस्ता अत्यंत महत्वकांक्षी ठरणार आहे. संवग प्रसिध्दीसाठी आरोप अनेक वर्ष सत्तेत असूनही राष्ट्रवादीला हा रस्ता करता आलेला नाही. आता केवळ प्रसिध्दीसाठी पठारे बिनबुडाचे आरोप करीत असल्याची टिका आमदार मुळीक यांचे बंधू नगरसेवक योगेश मुळीक यांनी केली आहे.