Tue, Jul 23, 2019 16:43होमपेज › Pune › राज कपूरसाहेब माझ्यासाठी विद्यापीठ

राज कपूरसाहेब माझ्यासाठी विद्यापीठ

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 1:14AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

कपूर कुटुंबीय गेल्या नव्वद वर्षांपासून चित्रपट क्षेत्रात काम करते आहे. यामध्ये आमच्या घराण्याच्या चार पिढ्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. माझ्या आजोबांचे आशीर्वाद माझ्यावर नेहमी आहेत. राज कपूर फक्त माझे वडील नसून, माझे गुरूसुद्धा आहेत. त्यांनी मला चित्रपट क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व बनवायला शिकविले. माझ्या प्रत्येक चित्रपटाचे काम सुरू असताना ते माझा उत्साह वाढवायचे. त्यांनी जे शिकविले आहे, ते मी कधीच विसरू शकत नाही. माझ्यासाठी राज 

कपूरसाहेब विद्यापीठ होते, असे मत हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी व्यक्त केले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पिफ फोरम’चे आयोजन करण्यात आले आहे, तिसर्‍या दिवशी आयोजित सत्रात ते ‘काँट्रिब्यूशन ऑफ अ‍ॅन अ‍ॅक्टर इन सिनेमा’ या विषयावर बोलत होते. या वेळी ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांची मुलाखत घेतली. ॠषी कपूर म्हणाले, प्रत्येक माणूस हा कलाकार असतो, व्यक्ती जसे खाते, चालते, जे-जे काही करते तो अभिनय असतो. आजचे कलावंत लक्षपूर्वक अभिनय करतात. नैसर्गिक अभिनयावर त्यांचा भर असतो. नैसर्गिक अभिनय आणि शास्त्रशुद्ध अभिनय यामध्ये तुलना करणे अशक्य आहे. हे दोनही त्या-त्या जागी आज योग्य आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीत गाणं, नृत्याला मोठे महत्त्व आहे. गाणं हे चित्रपटाला पुढे नेते. मी आजच्या गाण्यावर असमाधानी आहे. त्या गाण्यातील बोल न समजणारे असतात. आजच्या गाण्यातील शब्द अर्थहीन असतात. त्यातील शब्द आपलल्या कल्पनाशक्तीला चालना देत नाही.

मे वो कहा से लावू...?

‘पिफ फोरम’मध्ये आयोजित मुलाखतीत ॠषी कपूर विविध विषयांवर बोलले. त्या वेळी आर. के. स्टुडिओबद्दल बोलताना ते भावुक झाले. ॠषी कपूर म्हणाले, 16 सप्टेंबरला आर. के. स्टुडिओ आगीत जळून खाक झाला. या स्टुडिओमध्ये आम्ही केलेल्या चित्रपटांचे सर्व अविस्मरणीय साहित्य होते. या स्टुडिओच्या चार भिंती पुन्हा उभ्या राहू शकतील. मात्र, या आगीत आमचे सर्व चित्रपट साहित्य जळून खाक झाले. ‘मे वो कहा से लावू...?’, असे भावुक उद‍्गार त्यांनी काढले.