Sun, Sep 23, 2018 06:24



होमपेज › Pune › सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्‍यार्थीनीची आत्महत्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्‍यार्थीनीची आत्महत्या

Published On: Jan 15 2018 3:53PM | Last Updated: Jan 15 2018 3:53PM

बुकमार्क करा




पुणे: प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार आज घडला. रेश्मा गायकवाड (वय 23, शिरूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. 

रेश्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती विद्यापीठातील मुलींच्या तीन नंबर वसतिगृहात राहत होती. तिच्यासोबत इतर चार मैत्रिणीही राहत होत्या. 
दरम्यान मैत्रिणी बाहेर गेल्यानंतर तिने रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्धा  तासानंतर तिच्या मैत्रीणी रूमवर आल्यानंतर हा प्रकार समोर आला. चतुरशृंगी पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.