Mon, Apr 22, 2019 21:41होमपेज › Pune › सरपंचपदासाठी उमेदवारच नाही

सरपंचपदासाठी उमेदवारच नाही

Published On: Feb 27 2018 1:58AM | Last Updated: Feb 27 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

गावागावांत सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू असताना खेड तालुक्यातील परसूल, आंबेगावातील तळकेरवाडी आणि जुन्नर तालुक्यातील पांगरीतर्फे मड ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. तर 168 ग्रामपंचायत सदस्यपदासाठीही अर्ज आले नाहीत. त्यामुळे येथे पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक, 271 ग्रामपंचायतीमधील 273 सदस्यांसाठी तर पोटनिवडणूक होत असलेल्या 5 सरपंचपदासाठी आज मतदान होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीतील 36 ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या 40 जागा रिक्त असून, 56 जागांसाठी 210 उमेदवार रिंगणात आहेत.

सरपंचपदासाठी पोटनिवडणुकीत 3 ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील पांगरीतर्फे मड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सलग दुसर्‍यांदा उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्याबरोबरच खेड तालुक्यातील परसूल आणि आंंबेगावमधील तळकेरवाडी येथीलही निवडणुकीत सरपंचपदासाठी उमेदवारी आर्ज दाखल झाला नाही. 
सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या 36 ग्रामपंचायतींमधील 12 ठिकाणचे सरंपच हेे बिनविरोध निवडले आहेत.

त्यामुळे 22 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 66 उमेदवार रिंगणात आहेत. रिक्त असलेल्या बहुतांश जागा या आरक्षित असून विजयी झाल्यानंतर वैध जातप्रमाणपत्र निवडणूक विभागाला सदार करणे बंधनकारक आहे, परंतु अनेकांना प्रमाणपत्र वैधतेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करता येत नाहीत. त्यामुळे या जागा रिक्त असण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.