Mon, Apr 22, 2019 03:44होमपेज › Pune › 30 मुख्याध्यापकांचे वेतन शिक्षणाधिकार्‍यांनी रोखले

30 मुख्याध्यापकांचे वेतन शिक्षणाधिकार्‍यांनी रोखले

Published On: Jan 30 2018 2:19AM | Last Updated: Jan 30 2018 12:35AMपुणे : लक्ष्मण खोत  

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या शाळांच्या मुख्याध्यापकांचे वेतन थांबविण्याचे आदेश माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सुमारे 30 मुख्याध्यापकांचे वेतन रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समायोजन करून घेण्यास नकार देणार्‍या शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे व्यपगत करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्याने 2016-17 च्या संचमान्यतेनुसार तब्बल 152 शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांचे माध्यमिक शिक्षण विभागाद्वारे ऑक्टोबर 2017 महिन्यात ऑनलाईन पद्धतीने समायोजन करत त्यांना रुजू करुन घेण्याचे आदेश शाळांना देण्यात आले होते. त्यानुसार सुमारे 66 अतिरिक्त शिक्षकांना समायोजन केलेल्या शाळांनी रुजूू करून घेतले आहे. दरम्यान, अद्याप 30 शिक्षकांना रुजू करुन घेण्यास शाळांद्वारे टाळाटाळ सुरुच आहे. अशा शाळांच्या मुख्याध्यापकाचे वेतन थांबविण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहेत. 

माध्यमिक शिक्षण विभागाद्वारे संबंधित शाळा प्रशासनाला वेळोवेळी शिक्षकांना रुजू करुन घेण्याचे आदेश देण्यात आले होते. यापूर्वी 30 ऑक्टोबर आणि  4 डिसेंबर 2017 रोजी शिक्षकांना रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच 30 डिसेंबर अखेर शिक्षकांना रुजू करुन न घेतल्यास संबंधित शाळांतील रिक्त पदे व्यपगत करण्याचा इशारा शिक्षणाधिकार्‍यांनी दिला होता. त्यानंतरही शिक्षकांना रुजू करुन न घेतलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे वेतन रोखण्याचा आदेश देण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी दिले आहेत.  अतिरिक्त शिक्षकांना रुजू करुन न घेता शाळांद्वारे शिक्षण विभागाच्या आदेशाला केेराची टोपली दाखवली जात होती. दरम्यान, या कारवाईमुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनातील अडथळे दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.