Sat, Jun 06, 2020 19:02होमपेज › Pune › संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ

Published On: Jul 07 2018 3:59PM | Last Updated: Jul 07 2018 3:58PMपुणे : प्रतिनिधी

श्री क्षेत्र पंढरपूर च्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पुण्याकडे मार्गक्रमण केले. आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना आळंदीकरांनी भक्तिभावाने निरोप दिला. पावसाची रिमझिम हवेतील गारवा वारकऱ्यांचा उत्साह वाढवत होता. टाळ, मृदंग ,वीणा हरिनामाचा गजर करत परिसर दुमदुमून गेला होता.

आळंदीतील आजोळ घरातून पहिला मुक्काम संपवून माऊलींच्या पालखी सोहळ्याने वेळेत प्रस्थान केले होते. विविध फुलांनी सजवलेला रथ, मानाचे अश्व,  अत्तराचा घमघमाट आणि विठुरायाच्या भजनाचा निनाद करत दिंड्यांनी मार्गक्रमण केले.