होमपेज › Pune › आरटीओ राबविणार ‘एक दिवस नो हॉर्न’... प्लीज

आरटीओ राबविणार ‘एक दिवस नो हॉर्न’... प्लीज

Published On: Sep 02 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी तसेच वाहनचालकांसह महाविद्यालयीन तरुण-तरुणी, नागरिकांची जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) वाहतूक विभागासह एक दिवस नो हॉर्न, उपक्रम राबविणार आहे. 12 सप्टेंबरला शहरातील महाविद्यालये, विविध रस्त्यांवरील वाहनचालक, चौकामध्ये हॉर्न न वाजविण्याबद्दल शपथ दिली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत उपस्थित होते.

वाहनचालकांकडून सातत्याने हॉर्नचा वापर केल्यास ध्वनिप्रदूषणासह नागरिकांचे स्वास्थ बिघडण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर एक दिवस नो हॉर्न उपक्रम राबविण्यासाठी आरटीओ, वाहतूक विभाग सरसावले आहेत. आरटीओच्या नोंदीनुसार शहरात 37 लाखांवर वाहने असून जिल्ह्याभरातील वाहन आकडेवारी 59 लाखांवर आहे. दरम्यान, बहुतांश वाहनचालकांकडून दिवसभरात किमान पाचवेळा हॉर्न वाजविला जातो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांसह  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांची भेट घेऊन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नो हॉर्न डे साजरा करण्यासाठी जिल्हा परिषद, महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, शिक्षण विभाग, पीएमपीएल, रिक्षा, टॅम्पो संघटना, एसटी महामंडळ सहभागी होणार आहेत. तसेच अभियानांतर्गत हॉर्नद्वारे  होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी व्हिडिओ क्‍लीप, जिंगल्स, पोस्टर्स व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 25 हजारांपासून 10 हजारापर्यंत पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धकांनी व्हिडिओ क्‍लीप पेहेीपाह12.1ऽसारळश्र.लेा, पेहेीपाह12.2ऽसारळश्र.लेा, हेीपाह12.3ऽसारळश्र.लेा, मेलवर 30 सप्टेंबरच्या आत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.