होमपेज › Pune › खासगी बसेसवर आरटीओची धडक कारवाई

खासगी बसेसवर आरटीओची धडक कारवाई

Published On: May 14 2018 5:04PM | Last Updated: May 14 2018 5:03PMपुणे : प्रतिनिधी 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खासगी वाहतूक करणाऱ्या बसेसवर धडक कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान ३२ खासगी बस जप्त करण्यात आल्या असून, १२५ बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान ५१८ बसेसची तपासणी करण्यात आली. 

दीडपटीपेक्षा जादा भाडे वाढ, टॅक्स नसणे, पासिंग (योग्यता प्रमाणपत्र),  परवाना, परमिट नसणे यांसारख्या विविध कारणास्तव या खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे.

Tags : pune rto,  private bus