होमपेज › Pune › विजेच्या धक्का बसून मुलाचा मृत्यू

विजेच्या धक्का बसून मुलाचा मृत्यू

Published On: Dec 02 2017 2:08AM | Last Updated: Dec 02 2017 1:34AM

बुकमार्क करा

पुणे / वाघोली : प्रतिनिधी 

झाडावर पडलेला टॉवेल लोखंडी रॉडने काढण्याच्या प्रयत्नात असताना महावितरणच्या उच्चदाब वाहिनीचा धक्का बसून रोहित विकास जावळे (वय 15) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 30) दुपारी तीनच्या सुमारास लोहगाव येथील रामचंद्रनगर येथे घडली. या घटनेत अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. 

 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हा आपल्या मामाकडे लोहगाव येथील रामचंद्रनगर येथे राहायला होता. इमारतीजवळून महावितरणची उच्चदाबाची वाहिनी गेली असून जवळच एक झाड आहे. या झाडावर टॉवेल पडल्यामुळे आजी कुसुम रॉडने टॉवेल काढण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना विजेचा धक्का बसला; परंतु ही बाब रोहितला कळली नाही आणि रोहितने त्याच रॉडने टॉवेल काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोहितला प्रचंड विजेचा धक्का लागला आणि रोहित फेकला गेला. जवळच असलेल्या आजी कुसुम भालेराव (वय 55) व मामेभाऊ (वय 2) यांनाही धक्का बसल्यामुळे तेही गंभीर जखमी झाले. यापूर्वीही अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत. मात्र वितरण कंपनी याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.