Sun, Apr 21, 2019 02:38होमपेज › Pune › शंकरमहाराज वसाहतीत रस्त्याचे काम सुरू

शंकरमहाराज वसाहतीत रस्त्याचे काम सुरू

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 12:19AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपुर्वी धनकवडी परिसरातील शंकरमहाराज वसाहतीतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. स्थानिक नागरिकांना रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले होते. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या वृत्ताची दखल घेत स्थानिक प्रशासनाने रस्ते बनविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे.  याबद्दल स्थानिक नागरिकांनी दै.‘पुढारी’चे आभार मानले आहेत. तसेच प्रशासनाने कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

रस्त्याच्या समस्येबरोबरच परिसरातील ड्रेनेज लाईन तुंबण्याच्या समस्येला देखील नागरिकांना सामोरे जावे लागत होते. तसेच पावसाळ्यादरम्यान अनेक नागरिकांच्या घरात ड्रेनेजचे पाणी मुरत असल्याचे पहायला मिळाले होते. त्यासंदर्भात देखील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. सध्या परिसरातील ड्रेनेज लाईन बदलण्याचे देखील काम सुरू आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये एकप्रकारे नाराजीचा सूर उमटत आहे.

गेल्या अनेक दिवसांपुर्वी परिसरातील चेंबर रस्त्याच्या वरती आले होते. त्यामुळे वाहन चालकांसह पादचार्‍यांना रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले होते. तसेच मातीचा रस्ता असल्यामुळे संपूर्ण रस्ता घुशींनी पोखरला होता. त्यामुळे जमीन भूसभूशीत होऊन ठिकठिकाणी रस्ता खचला होता. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे भविष्यात नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.