Sat, Jul 20, 2019 09:03होमपेज › Pune › अकरा रेशन दुकानांचे परवाने रद्द

अकरा रेशन दुकानांचे परवाने रद्द

Published On: Dec 23 2017 2:31AM | Last Updated: Dec 23 2017 1:32AM

बुकमार्क करा

पुणे :  समीर सय्यद

रेशनवरील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी शहरात ‘पॉस’ मशिनचा वपर केला जात आहे. मात्र, 1 एप्रिल 2017 पासून काळा बाजार करणार्‍या 92 दुकांनाची चौकशी करण्यात आली आहे. त्यातील 81 दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली, तर 11 दुकानांचे परवाने रद्द केले असून पुरवठा विभागाच्या या कारवाईमुळे धान्याचा काळाबाजर करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. शहरामध्ये अन्नधान्य वितरणची 11 परिमंडळीय कार्यालये आहेत.

या कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील स्वस्त अन्नधान्य वितरण केंद्रांवर शासनाच्या आदेशानुसार ‘ई-पॉस’ मशिन बसविण्यात आली आहेत. या मशिनद्वारे शिधापत्रिकाधारकांच्या अंगठ्याचा ठसा (थंब इम्प्रेशन) घेऊन स्वस्त धान्य वितरित केले जाते. तरीही स्वस्त धान्य वितरकांनी अपहाराचा मार्ग शोधला आहे. ‘ई-पॉस’ मशिन बसविण्यात आल्यानंतरही स्वस्त धान्य वितरकांकडून धान्यसाठा आणि वितरण यामध्ये अपहार करण्यात येत असल्याच्या तक्रारी वितरण विभागाकडे आल्या होत्या. 

काही दिवसांपूर्वी मुंढवा आणि पिंपरीत येथे धान्याचा काळा बाजार होत असल्याचा प्रकार समोर आला होता. धान्याचा काळा बाजार करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. 1 एप्रिलपासून आतापर्यंत शहर पुरवठा विभागाकडे 92 रेशन दुकानांविरोध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आलेल्या तक्रारींची शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या भरारी पथकांनी शहानिशा करून संबंधित दुकानांतील धान्य वितरणाच्या नोंदींची (मस्टर) चौकशी केली. त्यात 81 दुकानांतील नोंदीमध्ये तफावत अढळून आली. त्यामुळे प्रति तीन हजार रुपयेप्रमाणे 81 दुकानांवर दोन लाख 76 रुपयांची अनामत रक्कम जप्तीची कारवाई करण्यात आली, तर 11 दुकांनाचे परवाने रद्दची कारवाई करण्यात आली असून दोन दुकानदारांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच धान्याच्या साठ्यात तफावत मिळून आली, त्याबद्दल 28 लाख 69 हजार 19 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.