Sun, Nov 18, 2018 07:20होमपेज › Pune › बलात्कारप्रकरणी एकाची पोलिस कोठडीत रवानगी

बलात्कारप्रकरणी एकाची पोलिस कोठडीत रवानगी

Published On: Dec 14 2017 2:16AM | Last Updated: Dec 14 2017 1:27AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी 

पत्नीचा खून करून पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणार्‍या एकाला राजगड पोलिसांनी अटक केली. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदाने यांनी त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. भाऊसाहेब सीताराम आखाडे (21, आखाडे वस्ती, हवेली) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत 14 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 18 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. एक महिन्यापूर्वी भाऊसाहेब आखाडे यांनी पोलिस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना भाऊसाहेबच्या पत्नीचा मृतदेह सापडला होता.

दरम्यान आपलीच नातेवाईक असलेल्या मुलीला घेऊन तो पसार झाल्याने त्याला याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्यानेच खून केल्याचे निष्पन्न झाल्याने सुरूवातीला खून प्रकरणात पोलिस कोठडी सुनावन्यात आली. दरम्यान, त्याला बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून वैद्यकीय तपासणीसाठी, तसेच त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का ? याचा तपास करण्यासाठी सरकारी वकीलांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.