होमपेज › Pune › पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता

पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता

Published On: Aug 15 2018 1:21AM | Last Updated: Aug 15 2018 12:47AMपुणे : प्रतिनिधी

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या चार दिवसांत कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने मंगळवारी वर्तविली. 

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरसह  अनेक ठिकाणी सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पूर्व विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून, पश्‍चिम विदर्भासह मराठवाड्यात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.