Sun, Nov 18, 2018 20:19होमपेज › Pune › वनाझ ते रामवाडी  ‘जलद कृती दल’

वनाझ ते रामवाडी  ‘जलद कृती दल’

Published On: Dec 13 2017 2:46AM | Last Updated: Dec 13 2017 1:29AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवरील काम मोठ्या प्रमाणात सुरू  असून बांधकामादरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास अथवा बांधकामाच्या ठिकाणी काही अपघात झाल्यास महामेट्रोकडून ‘जलद कृती दल’ तैनात करण्यात आले आहे. या जलद कृती दलामार्फत अनेक सुविधा पुरवण्यात येत आहेत. या दलातर्फे 24 ताससेवा पुरवण्यात येणार आहे.  वनाज ते रामवाडी या मार्गिका दोनचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर गेल्या आठवड्यातच पहिल्या खांब उभारणीसाठी पाया तयार करण्यात आला. या खांबाच्या पुढील बांधकामासोबतच याच मार्गावरील पुढील तीन खांबाच्या पाया उभारणीचे काम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात आले आहे.

मेट्रो मार्गीकेच्या बांधकामावेळी संभाव्य  वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जलद कृती दलातील कर्मचारी सहाय्य करणार आहेत. तसेच हे बांधकाम चालू असताना त्या ठिकाणी काही अपघात सदृश्य परिस्थीती उद्भवल्यास जलद कृती दलामार्फत मदत पुरवण्यात येणार आहे. अपघातस्थळी प्रथमोपचारासारखे उपाय दलातर्फे करण्यात येतील, अशी माहिती या दलातर्फे देण्यात आली आहे. एकूण बारा कर्मचार्‍यांचे हे दल वनाझ ते डेक्कन परिसरात सध्या कार्यरत असणार आहे.