Wed, Mar 20, 2019 08:34होमपेज › Pune › पुणेकरांच्या प्रश्नांसाठी शिवसेना रस्त्यावर

पुणेकरांच्या प्रश्नांसाठी शिवसेना रस्त्यावर

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 12:44AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या पाठिशी उभी राहणार आहे. पुणेकरांना भेडसावणार्या विविध प्रश्नांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शिवसेना पुणे शहर कार्यकारिणी व विधानसभा कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर करण्यासाठी डेक्कन जिमखाना येथील शिवसेना भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोकाटे यांनी ही माहिती दिली. शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, पुणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, महिला आघाडीच्या शहरसंघटक संगीता ठोसर, सविता मते आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबई-बंगळुरू हायवेवर नसरापूर ते हिंजवडी या टप्प्यात अपघातांमध्ये बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यांवर संरक्षक कठडे उभारणे, सर्व्हिस रस्ते आणि अन्य मागण्यांसाठी पुढील आठवड्यात आंदोलन करण्यात येणार आहे. तर, चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे उद्घाटन होऊनदेखील जागा संपादन करण्यात अद्याप प्रगती झालेली नाही. आंदोलनावेळी या प्रश्नावरही पाठपुरावा करण्यात येणार आहे. मोकाटे म्हणाले, शिवसेनेतर्फे सांस्कृतिक विभाग सुरू करण्यात आला आहे. शिवसेनेतर्फे लवकरच रिक्षा, माथाडी, पथारी, प्रवासी, आदी विविध विभाग सुरू करण्यात येणार आहेत.