होमपेज › Pune › पुणे पोलिस म्हणजे अतिजागृत : पवार

पुणे पोलिस म्हणजे अतिजागृत : पवार

Published On: Jun 27 2018 1:57AM | Last Updated: Jun 27 2018 1:51AMपुणे : प्रतिनिधी

मागील काही घटना पाहता, पुणे पोलिस अति जागृत झाल्याचे दिसत आहे. कायदा हातात घेऊन पोलिस काम करत आहेत. कायद्याचा गैरवापर थांबविण्यासाठी आता आम्हाला लक्ष घालावे लागेल. हा गैरवापर थांबण्यासाठी आम्ही लवकरच धोरण ठरविणार्‍यांसोबत चर्चा करू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शाहू जयंती कार्यक्रमानिमित्त पवार मंगळवारी पुण्यात होते, त्यावेळी त्यांनी ही कोपरखळी मारली.

रविंद्र मराठे प्रकरणाबाबत पवार म्हणाले, पुणे पोलिस अततायीपणे कारवाया करत असल्याचे दिसत आहे. बँकेच्या व्यावहारावर निर्णय घेण्याचा अधिकार रिझर्व बँकेला आहे. पोलिस कायदा हातात घेऊन काम करत आहेत.