Wed, Nov 21, 2018 19:24होमपेज › Pune › घायवळ टोळीतील सात जणांना पोलिस कोठडी

घायवळ टोळीतील सात जणांना पोलिस कोठडी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

कुख्यात गुंंड नीलेश बन्सीलाल घायवळ (वय 42, रा शास्त्रीनगर, कोथरूड) टोळीच्या आणखी दोघांना दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. दोघांसह सात जणांना न्यायालयाने 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

पंक्या उर्फ पंकज सुरेश वाभिंरे (24, कोथरूड) आणि बबन बाळासाहेब कोरे (25, मु. पो. कोडोली जि. सातारा) अशी नवीन अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर अक्षय दिलीप गोगावले (20), संदिप राम फाटक (27), महेश बाळासाहेब आदवडे (28, तिघेही रा. शास्त्रीनगर, कोथरूड), संतोष उर्फ दादू नागू कांबळे (30, रा. हनुमाननगर, दत्‍तवाडी), स्वप्नील उर्फ मुन्ना सुखदेव रॉय (26, जनता वसाहत), घायवळ टोळीचा म्होर्‍हक्या नीलेश आणि साथीदार सागर सोनाबा जोगावडे (29, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.  विकी सिबू रवानी (वय 22, रा. ढोले पाटील रस्ता, मूळ. झारखंड) याने याबाबत फिर्याद दिली आहे. 

घायवळ याच्या सांगण्यावरून  त्याचे 15 ते 20 साथीदार तीन चारचाकी आणि एक दुचाकीमधून संबंधित हॉटेलमध्ये घुसले. विकी यादव कोठे आहे, असे विचारत हॉटेलचे  वस्थापक आणि गिर्‍हाईकांना मारहाण केली. त्यानंतर गल्ल्यातील 13 हजार 700 रुपयांची जबरी चोरी करून सर्वजण फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना 12 नोव्हेंबर 2017 रोजी ढोले पाटील रस्ता येथील एका हॉटेलमध्ये रात्री 12 च्या सुमारास घडली होती. लष्कर पोलिसांच्या एका गुन्ह्यात घायवळ आणि त्याच्या थीदाराची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तेथून गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाच्या पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. इतर आरोपीही निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यासाठी सरकारी वकिलांनी पोलिस कोठडीची मागणी केली.न्यायालयाने ती मंजूर केली.