Sun, Aug 18, 2019 15:32होमपेज › Pune › चाकण हिंसाचारप्रकरणी आंदोलकांची धरपकड सुरू

चाकण हिंसाचारप्रकरणी आंदोलकांची धरपकड सुरू

Published On: Aug 02 2018 1:42PM | Last Updated: Aug 02 2018 1:42PMराजगुरूनगर (पुणे) : पुढारी ऑनलाईन

चाकण हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्‍या चाकण बंद दरम्‍यान झालेल्‍या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत विविध ठिकाणांहून  २० जणांना ताब्‍यात घेतले आहे. 

सोमवार (३० जुलै)च्या घटनेत वाहनांची तोडफोड व जाळपोळ करणाऱ्या १०० हून अधिक तरुणांची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून पटली असून, सर्वांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. लवकरच त्यांना अटक करून नावे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

दरम्यान, ३० जुलैला चाकणमध्ये झालेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये काहीजण जखमी झाले होते तर अनेक वाहने जळून खाक झाली होती. त्यांनंर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली आहे.