Wed, Apr 24, 2019 19:45होमपेज › Pune › महापौर जाधव यांनी केलेले वर्तन  भारतीय संस्कृतीला साजेसे 

महापौर जाधव यांनी केलेले वर्तन  भारतीय संस्कृतीला साजेसे 

Published On: Aug 11 2018 2:34PM | Last Updated: Aug 11 2018 2:34PMपिंपरी : प्रतिनिधी

महापौर राहुल जाधव यांनी राज ठाकरे यांना  वाकून  नमस्कार केल्याने ज्यांना पोटशूळ उठला आहे तो चुकीचा आहे. राज ठाकरेंना अभिवादन करणे म्हणजे ओबीसी चळवळ दावणीला बांधणे होत नाही. विरोधकांशी गळाभेट अथवा वयपरत्वे अभिवादन करण्याची अनेक उदाहरणे आहेत. महापौर राहुल जाधव यांनी भारतीय संस्कृतीला‌ साजेशेच वर्तन केले आहे. त्यावर  हरकत घेणार्‍याची कोल्हेकुई म्हणजे "चळवळीतील कामातून"सामाजिक कार्यकर्ता"म्हणून गेलेली पत मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे अशी टीका बारा बलुतेदार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रताप गुरव यांनी केली आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल पिंपरीत एका खासगी कार्यक्रमात आले असताना महापौर राहुल जाधव यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या या कृतीबाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आक्षेप घेतला .मंडल अहवालाबाबत  माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्याबाबत राज यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत आता बारा बलुतेदार संघ महापौरांबाबत काय भूमिका घेणार असा प्रश्न त्यांनी केला आहे त्यास प्रताप गुरव यांनी उत्तर दिले आहे. 

संबधिताने अनावश्यक "गरळ"ओकली आहे. गरळ ओकणाऱ्या व्यक्तिबरोबर चळवळीच्या माध्यमातून ‌संबध आला होता. पहिल्यापासूनच त्यांच्या भूमिकेबाबत मनात शंका होत्या. परंतु चळवळीतील नेते मानव कांबळे यांनी जीवनात माणूस बदलतो हा देखील ‌बदलेल याची खात्री बाळगा. हा  दिलेला सल्ला  मानून आम्ही त्या व्यक्तिला गल्ली पासून दिल्लीपर्यंत झोतात आणले. २००७ च्या पालिका निवडणुकीत  निवडुन आणण्यात खारीचा वाटा उचलला.वार्ड‌ सभा घेणारा देशातला नगरसेवक म्हणून त्याचे ढोल वाजवून प्रसिद्धी मिळवून देण्यात बारा बलुतेदार व ओबीसी , आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आघाडीवर होते.

या संवग लोकप्रियतेमुळे सदर प्रवृत्ती  हवेत तरंगयाला लागली.मिडीयावरील‌ होणा-या  चर्चेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता अशी बिरूदावली मिळालेल्या या कार्यकरत्याच्या नावाप्रमाणेच उड्या या शहरभर चालू झाल्या.शहरातील कोणत्याही प्रश्नात संवग लोकप्रियतेसाठी शेपटीला आग लावणा-या चिंध्या ‌तयारच असत.

परंतु कारल्याची भाजी खाल्ल्याशिवाय त्याची चव कळत नाही.तसेच काहीसे या प्रवृत्ती बाबत झाले.आतापर्यंत ओपन जागेवर निवडणूक लढवणा-याने २०१७साली ओपनची जागा असतानाही कुणबी ओबीसी ‌दाखला आणून मनपा निवडणूक लढविली.प्रत्येक वेळी प्रसंग येईल ‌तसा रंग बदलला एका बाजूला कुणबी दाखला आणून आरक्षणाचा फायदा घ्यायचा'आणि दुसरीकडे मराठा आरक्षण मोर्च्यात पुढाकार घ्यायचा अशी  दुटप्पी भूमिका मराठा  तरूणानी  ओळखली आहे.म्हणून  इकडे तिकडे उड्या मारण्यापेक्षा एका जागी स्थिर राहून चळवळीतून मिळालेल्या अनुभवाचा लोककल्याणासाठी वापर करा. असे  आवाहन प्रताप गुरव यांनी केले आहे