Tue, Feb 19, 2019 23:21होमपेज › Pune › पासपोर्टने ओलांडला 3.5 लाखांचा टप्पा

पासपोर्टने ओलांडला 3.5 लाखांचा टप्पा

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 05 2018 11:55PM

बुकमार्क करा
पुणे : केतन पळसकर

शहरातील पासपोर्ट कार्यालयाने 2017 साली झेप घेत सुमारे साडेतीन लाखाचा आकडा पार केला आहे. सन 2016 सालाच्या तुलनेत यावर्षी 69 हजार पासपोर्टची भर पडली आहे. त्यामुळे, 2017 मध्ये शहरातील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करीत भरारी घेतली आहे. पासपोर्ट कार्यालयाच्या कामकाजात केलेले बदल, त्याकरिता तंत्रज्ञाचा घेतलेला आधार यामुळे प्रत्येक नागरिकाला पासपोर्ट काढणे आज सोयीस्कर झाले आहे. सन 2017 या साली 3 लाख 58 हजार 132 अर्ज शहरातील क्षेत्रीय कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. त्यातील 3 लाख 42 हजार 506 अर्ज वैध ठरत नागरिकांना पासपोर्ट देण्यात आले. 

याआधी नागरिकांना पासपोर्ट प्रक्रियेकरिता 15 दिवसानंतरच्या तारखा मिळायच्या. त्यातुलनेत, अर्ज केल्यानंतर दुसर्‍या दिवशी तारीख उपलब्ध करून देण्याची सोस पररास्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आधिपत्यात येणार्‍या पासपोर्ट सेवा कार्यालयाने केली आहे. पूर्वी असणार्‍या या विभागाच्या संथ कारभारामुळे सन 2016 मध्ये 2 लाख 78 हजार 107 अर्ज पासपोर्ट कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. त्यातील 2 लाख 42 हजार 506 अर्ज वैध धरत नागरिकांना पासपोर्ट देण्यात आले होते.

पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने नागरिकांना आता पासपोर्ट काढणे सोपे झाले आहे. या सोयीस्कर ऑनलाइन पद्धतीमुळे यावर्षी 69 हजार 133 पासपोर्टची भरत पडली आहे. अर्ज केल्यानंतर त्वरित दुसर्‍या दिवशी तारीख मिळत असल्याने दिवसेंदिवस पासपोर्ट काढणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे.