Wed, May 22, 2019 10:25होमपेज › Pune › पालिका सभागृह गळती विरोधात मनसेचे आंदोलन

पालिका सभागृह गळती विरोधात मनसेचे आंदोलन

Published On: Jun 22 2018 5:03PM | Last Updated: Jun 22 2018 5:02PMपुणे : प्रतिनिधी,

महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीच्या उद्‍घाटन समारंभावेळी झालेल्या पाणीगळतीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज महापालिकेत अभिनव पद्धतीने छत्र्या  आणि रेनकोट परिधान करून घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. शहराची इज्जत वेशीवर टांगणाऱ्या संबंधीतांवर कडक कारवाई करावी आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी  केली. 

वसंत मोरे म्हणाले, महापालिका विस्तारित इमारतीचे उद्‍घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल करण्यात आले, त्यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम चालू असताना सभागृहात पाणी गळती झाली. त्यामुळे उपराष्ट्रपतींसमोर पुण्याची नाचक्की झाली. याला सत्ताधाऱ्यांची घाई कारणीभूत असल्याचा आरोप केला. त्यामुळे या निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच याबाबतचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.