Sat, May 25, 2019 23:44होमपेज › Pune › पद्मावत चित्रपटाचे पोस्टर फाडले

पद्मावत चित्रपटाचे पोस्टर फाडले

Published On: Jan 24 2018 1:48AM | Last Updated: Jan 24 2018 12:53AMखडकी : वार्ताहर :

विल्क्स टॉकीजमध्ये पद्मावत चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे पोस्टर आठ ते दहा युवकांनी फाडल्याची घटना घडली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विल्क्स टॉकिजमध्ये लावण्यात आलेल्या पोस्टर पाडल्याप्रकरणी टॉकीजचे सरव्यवस्थापक सुहास पवार यांनी खडकी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चित्रपट प्रदर्शित होणार असून त्या दरम्यान पोलीस संरक्षणाची मागणी पवार यांनी पोलिसांना केली आहे.

बाजार परिसरामध्ये विल्क्स टॉकीज असून यामध्ये गुरुवारी रात्री पद्मावत हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चित्रपटगृहाबाहेर पद्मावत चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र सोमवारी रात्री आठ ते दहा युवकांनी हातामध्ये हॉकी स्टिक घेऊन बोर्डचा तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, तसेच पद्मावत चित्रपट चित्रपटाचे पोस्टर फाडण्यात आले.