Mon, Sep 24, 2018 19:25



होमपेज › Pune › पासवर्ड चोरून फसवणूक करणार्‍या वेटरला पुण्यात अटक

पासवर्ड चोरून फसवणूक करणार्‍या वेटरला पुण्यात अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पिंपरी : प्रतिनिधी

हॉटेल जेवणासाठी गेल्यानंतर बील भरण्यासाठी डेबीड, क्रेडीट कार्ड दिल्यानंतर छुप्या कॅमेर्‍याद्वारे पासवर्ड चोरुन, बनावट कार्डचा वापर करुन अनेकांची फसवणूक करणार्‍या हॉटेलच्या वेटरला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या महाठगाकडे बनावट कार्ड आढळून आलेली आहेत. हिंजवडी येथील झक्कास हॉटेलमध्ये तीन दिवसांपासून हा कामाला आला होता.

विकी रामआवतार अगरवाल (३६, रा. कोणार्क पुरम सोसायटी, कोंढवा) या महाठगास अटक केली आहे. तर याप्रकरणी हॉटेल मालक गणेश पाटील (३७, रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दिलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकी अगरवाल हा हिंजवडी येथील हॉटेल झक्कास येथे तीन दिवसांपासून वेटर म्हणून काम करत होता. तो काम करत असताना हॉटेलमधील बील भरण्यासाठी ग्राहकांनी दिलेल्या डेबीड, क्रेडीट कार्डचा पासवर्ड आणि डाटा चोरत होता. कार्ड स्वॅप करत असताना छुप्या बटण कॅमेर्‍याद्वारे कार्डची सगळी माहिती सेव्ह करुन ठेवत होता. याबाबत पाटील यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

हिंजवडी पोलिसांनी तत्काळ तपास करुन अगरवाल याला अटक केली. त्याची आणि तो राहत असलेल्या ठिकाणची झडती घेतली असता त्याच्याकडे काही बनावट कार्ड आढळून आली. तसेच छुपा कॅमेराही आढळून आला. पुढील तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.