Tue, Apr 23, 2019 20:09होमपेज › Pune › डाळींबाच्या शेतात एकाचा दगडाने ठेचून खून

डाळींबाच्या शेतात एकाचा दगडाने ठेचून खून

Published On: Apr 05 2018 1:26PM | Last Updated: Apr 05 2018 1:26PMनिमगांव केतकी : प्रतिनिधी 

इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी- वडापुरी रस्त्यालगतच डाळिंबाच्या बागेत एका इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रामभाऊ मारुती वाघमोडे (वय ३५ वर्षे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह पंधारवाडी गावातील मोहन बाबूराव निंबाळकर यांच्या गट नंबर १८० च्या १ शेतजमीनीतील डाळिंबाच्या बागेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. वाघमोडे यांच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला मोठा दगड आहे. आसपास खिशातील पाकिट, कंगवा, लहान कटर या वस्तू पडल्या होत्या. त्या वस्तू नेमक्या कुणाच्या आहेत याचा शोध इंदापूरचे पोलिस करित आहेत.

घटनास्थळी इंदापूरचे पोलिस निरीक्षक सजन हंकारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ननावरे, हवालदार शंकरराव वाघमारे, विनोद पवार, जगदीश चौधर हे खुनाचा तपास करीत आहेत.