Wed, Jun 26, 2019 23:33होमपेज › Pune › पुणेकराकडून भारतीय सैन्याला ४० कोटींची देणगी

पुणेकराकडून भारतीय सैन्याला ४० कोटींची देणगी

Published On: Jul 15 2018 5:44PM | Last Updated: Jul 15 2018 5:46PMपुणे : देवेंद्र जैन  

देशाच्या संरक्षण सेवे करीता ऱाधा कलैणदास दर्याणानी चँरिटेबल ट्रस्ट चे पुणेकर असलेले सर्वेसर्वा प्रेमजी दर्याणानी यांनी पुणे मुंबई हम रस्त्यावर कान्हे फाटा येथे सहा एकर जमीन व एकुन १२ ईमारती ज्याची आजमीतीला ४० कोटी रुपये मुल्‍य होते. हे सर्व सैन्याच्या विधी (लाँ) काँलेजला दान दिली आहे. 

पुढारी प्रतिनिधी बरोबर बोलताना डाँ प्रेम दर्याणानी म्हणाले की, माझा परिवार हा मुंबई व पुणे येथे रहात आहे,  माझे आई वडील देशाच्या प्रगतीसाठी  प्रत्येक कामामध्ये मदत करत आले आहे, शिर्डी येथील साई संस्थानाला सुद्धा २७ एकर जमीन दान केली आहे. आपल्या देशात संरक्षण व्यवस्थेमध्ये विधी (कायदा)  शिक्षण करीता कोणतेही महाविद्यालय नाही. हाच दुवा पकडून आम्ही आमच्या मालकीची ६ एकर जमीन व त्यावर १२ ईमारती बांधुन, देशातले पहले संरक्षण महाविद्यालय सुरु करण्याचा संकल्प केला व तो उद्या सकाळी तडीस नेत आहोत. दक्षीण कमांडचे प्रमुख सोनी हे उद्या सकाळी या महाविद्यालयाचे उदघाटन करतील. सैन्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थीत राहणार आहेत. 

सैन्याचे हे विधी महाविद्यालय सावित्री बाई फुले विद्यापीठाला संलग्न असणार आहे.  याला राज्य सरकार व बार कौंन्सिल ऑफ ईंडीया ने मान्यता दिली आहे. २०१८/१९ च्या अभ्यासक्रमा करिता सैन्यातील सेवेत व निवृत्त झालेल्यांच्या ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ५ वर्षाचा बि बि ए, एल एल बी चा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे व त्याची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. 

देशाच्या ईतिहासात संरक्षण सेवे करीता एका भारतीयाची ही सर्वात मोठी देणगी आहे.  या संपुर्ण जागेचे ईमारतीसहीत बक्षीस पत्र दर्याणानी यांनी  ८ मार्च २०१८ रोजी आर्मी वेलफेअर एज्‍यकेशन सोसायटीला करुन दिले आहे.