Mon, Sep 24, 2018 16:57होमपेज › Pune › साखर उद्योगांसाठी शरद पवारांनी दिले दोन सल्ले

साखर उद्योगासाठी पुढील वर्ष कडू : शरद पवार

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 12:35PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

देशात आणि राज्यातही पुढील वर्षी ऊस पिकाखालील क्षेत्र प्रचंड आहे. म्हणून साखर उद्योगासाठी पुढील वर्ष हे अडचणीचे असून, कारखान्यांनी आतापासून गाळपाची आखणी करायला हवी; शिवाय कारखान्यांनी खर्चात काटकसर करून कारखाने चालविले पाहिजेत, असा सल्ला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे दिला. 

‘व्हीएसआय’च्या 41 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी ‘व्हीएसआय’च्या विविध पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, जयप्रकाश दांडेगावकर, शंकरराव कोल्हे, कल्लाप्पा आवाडे, राजेश टोपे, सतेज पाटील, बबनराव शिंदे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख,  साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील आणि साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित होते. 

शरद पवार म्हणाले, अंतरानुसार ऊस तोडणी वाहतुकीच्या खर्चाच्या निर्णयामुळे कारखान्याच्या जवळ ऊस असलेल्या शेतकर्‍यांचा वाहतुकीचा खर्च कमी होईल; पण बाहेरून ऊस आणावा लागेल; तरच कारखाने चालणार आहेत.

yes  1 पुढील वर्षी कारखाने जादाऊस उपलब्धतेमुळे लवकर सुरू होतील. कमी ऊस असलेल्या कारखान्यांनी जास्त ऊस असलेल्या कारखान्यांकडील ऊस गाळपासाठी पुढे यायला हवे. त्याचे  योजन आतापासून केले नाही, तर पुढील वर्षी जूनपर्यंत गाळप करण्याची वेळ येऊ शकते.

yes 2 भारताकडून आतापर्यंत साखरेची निर्यात केली जात होती. परंतु, आंतरराष्ट्रीय साखर परिषदेने साखर आयात  रावी, अशी भूमिका घेतली आहे. परंतु, ते शक्य नाही. वास्तविक पाहता जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर भारतापेक्षा जास्त असल्याचेही पवार यांनी सांगितले.