Fri, Jul 19, 2019 13:43



होमपेज › Pune › नववर्षाचे जल्लोषी स्वागत

नववर्षाचे जल्लोषी स्वागत

Published On: Jan 01 2018 2:02AM | Last Updated: Jan 01 2018 2:02AM

बुकमार्क करा




पुणे : प्रतिनिधी

रविवारी रात्री 12 वाजता घड्याळाचा ठोका पडला आणि 2017 हे वर्ष मागे सरून 2018 या नवीन वर्षाला सुरुवात झाली. या क्षणाची आतुरतेने वाट पाहणार्‍या पुणेकरांनी नयनरम्य रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी व एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. या निमित्ताने अनेकांनी नवीन संकल्प करीत विविध सामाजिक उपक्रम राबवत रात्र जागवली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळपासूनच उत्साही तरुणांनी रस्त्यावर गर्दी केली होती.

रोषणाईने सजविलेली हॉटेल्स, रंगबिरंगी फुगे, सांता क्लॉजच्या वेषात मिरविणारी तरुणाईमुळे शहरात उत्साह ओसंडून वाहात होता. शहरातील कोरेगाव पार्क, लष्कर परिसर, महात्मा गांधी रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, तसेच गोखले रस्त्यासह उपनगरांमध्येही आनंदोत्सव अनुभवायला मिळाला. झगमगती रोषणाई, आकाशात सोडण्यात येणार्‍या दिव्यांसोबत सेल्फी काढण्यात तरुणाई मग्न होती.