Tue, Nov 13, 2018 08:49होमपेज › Pune › ‘एनडीए’चा दीक्षान्त समारंभ जल्लोषात

‘एनडीए’चा दीक्षान्त समारंभ जल्लोषात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे :प्रतिनिधी

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) 133 वा दीक्षांत समारंभ बुधवारी (दि. 29) मोठ्या उत्साहात पार पडला. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष प्रा. डेव्हिड आर. सिम्लिह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एनडीएच्या हबिबुल्ला सभागृहात हा समारंभ मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी एनडीएचे कमांडंट एअर मार्शल जसजीतसिंग क्लेर उपस्थित होते. देशाच्या लष्करी सेवेत विविध ठिकाणी सेवा बजावण्यासाठी तीन वर्षांच्या खडतर प्रवासानंतर या प्रबोधिनीमधील विद्यार्थी सज्ज होतात. 

तीन वर्षांमध्ये त्यांना स्थलसेना, वायुसेना आणि नौसेना या तीनही दलांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. यंदाच्या वर्षीच्या 133 व्या तुकडीत बॅचलर ऑफसायन्सच्या 56, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्सच्या 146, बॅचलर ऑफआर्ट्सच्या 48, अशा एकूण 250 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयाची पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्रबोधिनीचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.