Fri, Nov 16, 2018 17:09होमपेज › Pune › ..हा तर भ्रमसंकल्‍प : सुप्रिया सुळे

..हा तर भ्रमसंकल्‍प : सुप्रिया सुळे

Published On: Feb 01 2018 2:51PM | Last Updated: Feb 01 2018 2:52PMपुणे : पुढारी ऑनलाईन 

केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत केंद्रिय अर्थसंकल्‍प सादर केला त्‍यावर राष्‍ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.  या अर्थसंकल्‍पावर बोलताना सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या या अर्थसंकल्‍पात बड्यांच्या कर्जवसूलीसाठी काहीही केल्‍याचे दिसत नाही. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असताना पेट्रोलचे दर कमी करण्याच्या दृष्‍टीने यात काही उपाययोजना केल्‍याचे  दिसत नाही. शेतीला कर्ज मिळण्यासाठीची सोयही दिसत नसून, बॅकाचे चार्जेस कमी करण्यासाठी कहीही केलेले नाही . असे सांगत,  मोठ्ठे मोठ्ठे आकडे दाखवायचे आणि पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रात अडकवायचं अशी टीका सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.