Wed, Jun 26, 2019 12:07होमपेज › Pune › ते माधुरीला भेटले, आपण मजुरांना भेटू : धनंजय मुंडे

ते माधुरीला भेटले, आपण मजुरांना भेटू : धनंजय मुंडे

Published On: Jun 10 2018 6:33PM | Last Updated: Jun 10 2018 6:33PMपुणे : प्रतिनिधी

पेट्रोल, डिझेलचे दर वाढतच चालले आहेत. तुम्हाला आम्हाला त्याची झळ पोहचत आहे. गॅसचे दर चार वर्षात चारशे रुपयांनी वाढले. यामुळे सामान्य माणसाचे जिने मुश्कील होत असताना, सत्‍ताधार्‍यांकडून सेलिब्रिटी आणि उद्‍योगपतींना चार वर्षाची गाथा पोहचवण्याचे काम सुरू आहे. ते जर माधुरीकडे जाणार असतील तर आपण मजुरांकडे जाऊ अशी उपरोधीक टीका  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता समारंभा दरम्यान ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा स्थापनादिन व पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलन यात्रेच्या सांगता समारंभातन ते बोलत होते. यावेळी बोलताना मुंडे म्‍हणाले, पेट्रोल ,डिझेलचे दर वाढत चालले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचं जगण कठीण बनलं आहे. गॅसचे दर चार वर्षात चारशे रुपयांनी वाढल्‍याने सर्वसामान्यांत रोष आहे. असे असताना, सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता सत्‍ताधार्‍यांकडून सेलीब्रेटी आणि उद्‍योगपतींना भेटून चार वर्षाची गाथा पोहोचविण्याचे काम सुरू आहे.

 मुंडे म्‍हणाले, ‘‘माधुरी दीक्षितला पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीची झळ पोहोचेल का? सिलेंडेरचे दर चार वर्षात चारशे रुपयांनी वाढले. त्याची झळ माधुरी दीक्षितला पोहोचेल का? त्यांना कदाचित या गोष्‍टींचे दर वाढलेलेसुद्धा माहित नसेल. आम्ही माधुरी दीक्षिताकडे जाऊ. चार वर्षांची गाथा तिच्यापर्यंत पोहचऊ. आमची गाथा आम्ही कपिल देवकडे पोहचऊ. ते बोलले आमची गाथा आम्ही रामदेव बाबाकडे पोहचऊ. बरे झाले लता दीदींनी वेळ दिला नाही. यांनी देशाचे जे वाटोळे केले आहे ते तुम्हाला आम्हाला माहीत आहे. ते चार वर्षाचे त्यांचे यश पुस्तकातून दाखवत असतील  तर आपण त्यांचे अपयश एका पुस्तकाच्या माध्यमातून दाखवू. ते माधुरीकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ.. ते टाटांकडे गेले तर आपण बाता खाणाऱ्या सामान्य माणसांकडे जाऊ. ते कपिल देवकडे गेले तर आपण बळीदेवाकडे जाऊ, असा टोला मुंडे यांनी भाजपला लगावला.