Fri, Apr 26, 2019 19:42होमपेज › Pune › पवारसाहेब म्‍हणतात, मशीनमधलं मत नक्‍की कुठं जातंय बघा!

पवारसाहेब म्‍हणतात, मशीनमधलं मत नक्‍की कुठं जातंय बघा!

Published On: Apr 29 2018 4:50PM | Last Updated: Apr 29 2018 4:50PMपुणे : प्रतिनिधी 

मतदानाला सुरूवात होण्यापूर्वी मतदान यंत्राचे जे प्रात्यक्षिक दाखविले जाते, तेव्हा मत नक्की कुठे जाते हे बघितले पाहिजे या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली चिंता व्यक्त केली. राष्‍ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रात मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याचे राजकीय आरोप झाले, त्यांची धास्ती अद्याप निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांना आणि राजकीय पक्षांना आहे, याचा प्रत्यय रविवारी पुण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, की  निवडणुका जवळ आल्या आहेत, त्याच्या तयारीला लागले पाहिजे, मात्र, त्यात मतदानाच्या मशिन संदर्भात काळजी घेतली पाहिजे, मतदाना आधी प्रात्यक्षिक दाखविताना ते मत नक्की कुठे जातंय  हे निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासून घ्या, या सदर्भातील काळजी बूथ लेवल वरील कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

आगामी निवडणुकीसाठी समविचारी पक्षांशी जागा वाटपाबाबत समर्थपणे पर्याय काढण्याचा प्रयत्न करू, मात्र रडीचा डाव चालणार नाही; असे पवारांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सुनावले.