Wed, Apr 24, 2019 21:49होमपेज › Pune › आता चुलीच्या धुरापासून महिलांना मुक्ती

आता चुलीच्या धुरापासून महिलांना मुक्ती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : नवनाथ शिंदे

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील महिलांना स्वयंपाकासाठी बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने हातभार लावला जाणार आहे. त्यामुळे चुलीच्या धुराड्यात स्वयंपाक करताना होणारी महिलांची घुसमट थांबणार आहे. सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना बायोगॅस संयंत्रासाठी 9 हजारांची मदत केंद्राकडून केली जाते. त्यामध्ये  पुणे जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येक लाभार्थ्यांसाठी 10 हजार रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बायोगॅस संयंत्र उभारणीची गती वाढण्यास मदत मिळणार आहे.

जिल्ह्यात सुमारे 845 बायोगॅस संयंत्राचे वार्षिक उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, 25 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्राच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेच्या सर्वसाधारण गटातील लाभाथ्यार्र्ंना प्रत्येकी 9 हजारांचे अनुदान देण्यात येते. तर, अनुसूचित जाती-जमातीच्या गटातील लाभार्थ्यांना 11 हजार रुपये अनुदान वितरित करण्यात येते. तसेच लाभाथ्यार्र्ंनी प्रकल्पास शौचालय जोडणी केल्यास 1 हजार 200 रुपयांचे वाढीव अनुदान देण्यात येते. दरम्यान, बायोगॅस प्रकल्प उभारताना खर्च जादा होत आहे.

त्यामुळे जि.प.च्या वतीने लाभार्थींना प्रत्येकी 10 हजारांची तरतूद करण्यात आली आहे.  प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 85 गावे प्रकल्पात समाविष्ट करण्यात आली आहेत. उद्दिष्टानुसार 739 लाभार्थींना बायोगॅस विकास जोडणीला मदत केली जाणार आहे. आतापर्यंत 217 लाभार्थ्यांच्या प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच 20 जणांच्या बायोगॅस प्रकल्पास शौचालयाची जोडणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 46 ठिकाणी बायोगॅस संयंत्र उभारणीची कामे सुरू आहेत.