Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Pune › प्रेयसीची छेड काढल्यानेच खून

प्रेयसीची छेड काढल्यानेच खून

Published On: Feb 07 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 1:05AMपुणे  :प्रतिनिधी 

प्रेयसीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाचा धारदार रॅम्बो सुर्‍याने वार करून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तिघांना मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 10 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.  सुरजित आलासिंग कलानी (24, शिवतेजनगर, बिबवेवाडी), आकाश मल्‍लेश गायगोळे (19, रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड) आणि रितेश श्रीराम बलीपाठक (32, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) अशी पोलिस कोठडी झालेल्या तिघांची नावे आहेत. गुलाम बागवान (रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याचा पोलिस शोध घेत आहे.  

सनी विलास शिंदे (20, रा. आण्णा भाऊ साठेनगर, अरण्येश्वर) याच्या खून प्रकरणी त्याचा मावस भाऊ आकाश राजू शिंदे (21, रा. धायरीगाव) यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.   फिर्यादी शिंदे यांचा मावसभाऊ सनी शिंदे याची  प्रेयसी अंजली शिंदे हिची आकाश गायगोळे आणि बलीपाठक यांनी छेड काढली. त्यानंतर सनी छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेला असता तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली; तसेच सुरजित कल्याणी याने त्याच्या पॅन्टीत दडवून आणलेल्या रॅम्बो सुर्‍याने वार करून खून केला.  सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी  कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.