Tue, Mar 26, 2019 11:40होमपेज › Pune › नगरसेविका नामधारी, पतिराज कारभारी

नगरसेविका नामधारी, पतिराज कारभारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे ;हिरा सरवदे 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण दिल्यानंतर पुणे महापालिकेतील 162 जागांपैकी तब्बल 85 जागांवर पुणेकरांनी महिलांना निवडून देत महिला सक्षमीकरणाच्या आणि सबलीकरणाच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. मात्र, या नगरसेविकांच्याच पतिराजांचा कारभार महापालिकेत पाहायला मिळत असल्याने महिला सबलीकरणाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. 

महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्यासाठी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याची संकल्पना अमलात आली. घटनेच्या 73 व्या आणि 74 व्या दुरुस्तीनुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण जागांपैकी एकतृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. सध्या देशातील 11 राज्यांनी हे आरक्षण 50 टक्क्यांवर नेले आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देताना महिलांचा राजकारणातील सहभाग वाढविणे हा मुख्य हेतू असला तरी त्यांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण करणे हाही हेतू होता. 

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणेकरांनी 162 जागांपेकी तब्बल 85 नगरसेविकांना निवडून देत महिला सबलीकरणाला हातभार लावत प्रत्येक गोष्टीत पुणे एक पाऊल पुढे असते, हे दाखवून दिले. पुणेकरांनी महिलांच्या बाजूने कौल दिला; मात्र निवडून आलेल्या नगरसेविकांचे पती त्यांना कामकाजामध्ये सैलपणा देण्यास तयार नसल्याचे वारंवार दिसत आहे. 
 


  •