होमपेज › Pune › स्थायी समितीच्या लॉटरीत विद्यमान अध्यक्षांना झटका

स्थायी समितीच्या लॉटरीत विद्यमान अध्यक्षांना झटका

Published On: Jan 31 2018 1:14PM | Last Updated: Jan 31 2018 1:13PMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या लॉटरीत सत्ताधारी भाजपला झटका बसला आहे. भाजपचे विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे चार सदस्य स्थायीतून बाहेर पडले आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीमधून निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांसांठी आज चिठ्या टाकून लॉटरी काढण्यात आली. भाजपच्या चार राष्ट्रवादीच्या दोन आणि काँग्रेस व शिवसेना यांच्या प्रत्येकी एक अशा आठ सदस्यांच्या नावाच्या चिठ्या निघाल्याने त्यांना स्थायीतून बाहेर पडावे लागणार आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत या सदस्यांची मुदत असेल, तर त्यांच्या जागी नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या मुख्यसभेत निवड केली जाणार आहे.

लॉटरीत चिठ्या निघालेल्या सदसयाची नावे 
मुरलीधर मोहोळ (भाजप), हरिदास चारवड (भाजप), अनिल टिंगरे (भाजप), योगेश समेळ (भाजप), नाना भानगिरे (शिवसेना), रेखा टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रिया गदादे (राष्ट्रवादी), अविनाश बागवे (काँग्रेस),