Thu, Jun 27, 2019 02:31होमपेज › Pune › ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ला कोलदांडा

‘पे अ‍ॅण्ड पार्क’ला कोलदांडा

Published On: Mar 23 2018 11:46PM | Last Updated: Mar 23 2018 11:46PMपुणे : प्रतिनिधी

शहरातील खासगी वाहनांना रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडीचा तिढा सोडविण्याच्या नवाखाली संपुर्ण शहरात ’पे अ‍ॅण्ड पार्क’ धोरण राबविण्या घाट पालिका प्रशासनाने घातला होता. त्याला स्थायीसमितीने मान्यता दिल्यानंतर सर्वच स्थरातून या धोरणाला तिव्र विरोध झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने युटर्न घेत संपूर्ण शहरासाठीचे पार्किंग धोरण सहा महिन्यासाठी पुढे ढकलले आहे. नामुष्की टाळण्यासाठी उपसूचनेव्दारे शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवर प्रायोगित तत्वावर ’पे अ‍ॅण्ड पार्क’ धोरण राबविण्यास मंजुरी दिली आहे. मुळ प्रस्तावातील रात्रीच्या  पार्किंग शुल्क वसुलीचा निणययी मागे घेण्यात आले आहे. 

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने झोन तयार करून पार्कींगचे धोरण तयार केले होते. या धोरणानुसार शहरातील प्रत्येक रस्त्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्यात रस्त्यावरील वाहनांची संख्या, नागरिकांची रहदारी व गर्दी विचारात घेऊन ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चे झोन निश्‍चित करण्यात आले आहेत. अ, ब, क अशा पध्दतीने हे झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ झोनमध्ये कमी वर्दळ पार्किंग, ब मध्ये तीव्र वर्दळ आणि क मध्ये अती तीव्र अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पार्किंगचे दर ठरवण्यात आले आहेत.

या धोरणानुसार रात्रीच्या वेळी सुध्दा रस्त्यावर ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ मोहिम राबविली जाणार होती.  त्याचा फटका सोसायट्यांमध्ये पार्किग नसलेल्यांना बसणार होता. दरम्यान शहरातील सर्व रस्त्यांवर ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना राबविल्यास रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. तो कितपत योग्य आहे, हे येणारा काळातच समजणार होते. 

पालिका प्रशासनाने तयार केलेल्या पार्कींग धोरणाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुर करून घाई गडबडीने त्याच दिवसी पालिकेच्या मुख्यसभेत दाखल केला होता. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे ही सभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर दुसर्‍याच दिवसी राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पार्किंग धोरणाच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर मनसेने महापौर, पालिका आयुक्त आणि    सभागृह नेते यांच्या गाडीला पार्किंगची डिजीटल पावती लावून आंदोलन केले होते. 

तहकुब सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेत सत्ताधारी भाजप बहुमताच्या बळावर पार्किंग  धोरण मंजुर करणार, या शक्यतेमुळे दिवसभर पालिका परिसरात अनेक पक्ष व संघटनांनी तिव्र आंदोलने केली.  सत्ताधारी हे पुणेकरांची लूट करीत असून पे अँड पार्क धोरण हे चुकीच्या पध्द्तीने आणण्यात आला आहे.या धोरणाला मंजुरी मिळाल्यास ठेकेदाराच्या माध्यमातून नागरिकांच्या खिसा कापण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप करीत असल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला. सर्व स्तरातून पक्षावर टीका होऊ लागल्याने या धोरणास भाजपच्या नगरसेवकांनीच पक्षाच्या बैठकीत विरोध केल्याने भाजपने प्रस्तावात मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. अखेर नामुष्की टाळण्यासाठी पालिकेच्या मुख्यसभेत पार्किंग धोरणाला उपसूचनेसह मंजुरी देण्यात आली. ही उपसूचना उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि     सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली. याबाबतचा निर्णय शुक्रवारी रात्री उशीरपर्यंत चाललेल्या पालिकेच्या मुख्यसभेत घेण्यात आला. या धोरणास मंजुरी देण्यात आली असली तरी प्रशासनाने समाविष्ट केलेल्या अनेक बाबी वगळण्यात आल्या आहेत.  त्यामुळे पार्किंग पोलिसी नाव पुरतीच उरल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शहारातील ज्या रस्त्यावर अधिक रहदारी असणार आहे, अशा प्रमुख पाच रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना सुरु करण्यात येणार आहे. पार्किंग धोरणात क वर्गात असलेल्या रस्त्याचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असेल. शहराच्या भविष्याच्या हि योजना मंजूर झाली पाहिजे, अशी भूमिका सत्ताधारी भाजपकडून सभागृहात मांडण्यात आली. 

नामुष्की टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर मार्ग 

पार्किंग धोरणाला स्थायी समितीने मान्यता दिल्यापासून भाजपवर सर्वच स्थरातून टिका केली जात होती. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांचाही या धोरणास विरोध होता. त्यांच्या विरोधाची चुणूक पक्षाच्या बैठकीत दिसली होती. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर  पुणेकरांची नाराजी ओढवून घेऊ नये, असे अनेकांचे मत होते. हा प्रस्ताव मंजुर करण्याचा फोन वरून आल्याने काय करावे, असा प्रश्‍न भाजप पदाधिकार्‍यांसमोर होता. माघार घेतली तर पक्षाला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठी मध्यम मार्ग काढत शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवर प्रयोगित तत्वावर ही योजना राबविण्याचा मार्ग भाजपणे स्विकारला आहे. दरम्यान धोरणाच्या अंमल बाजावणीसाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटीत करण्यात येणार्‍या गटनेत्यांच्या समितीमध्ये भाजप वगळता इतर सर्व पक्षाच्या गटनेत्यांनी समिल होण्यास नकार दिला आहे. 

 उपसूचनेद्वारे मुळ प्रस्तावात करण्यात आलेले बदल

* निर्णयासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची समिती व पदाधिकार्‍यांची समिती

* समिती सहा महिन्यात अहवाल सादर करणार

* विकास आराखडयात ताब्यात आलेल्या वाहांतळाच्या जगाचा अहवाल तयार करावा

* या जगाचे विकसन बांधा वापरा आणि हस्तातरीत करा ततत्वार करावे

* रात्रीचे पार्किंग शुल्क कोणत्याही स्थितीत आकारू नये

* या धोरणा अंतर्गत वसूल होणारा निधी वाहतूक सुधारणेसाठी खर्च करावा 
 

 

Tags : pune, pune news, pune municipal corporation, pay and park policy,  BJP postponed policy for six mounth